केळगावचा अभिमान:

वारकरी संप्रदायाशी निगडित धार्मिक केंद्र
ग्रामीण विकासासाठी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत
उच्च साक्षरता दर (८२%)
सांस्कृतिक उत्सव आणि वार्षिक सप्ताहांची परंपरा

सिद्धबेट ….

केळगाव आणि सिद्धबेट ही एकाच भूमीची दोन पवित्र रूपे आहेत. सिद्धबेट हे केळगावाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. येथे वारकरी, वैष्णव आणि संत भक्तांचे नामसप्ताह व उत्सव एकत्र साजरे होतात. सिद्धबेट हे अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थळ असून, येथे नवनाथ आणि चौऱ्यांशी सिद्धांच्या समाध्या आहेत. या परिसरात अजानवृक्ष, औदुंबर, वड, आंबा अशा निसर्गरम्य झाडांनी भरलेला परिसर आहे.
येथे श्री विठ्ठलपंत आणि श्री रुक्मिणी मातांचे मंदिर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री मुक्ताबाईंच्या जन्मभूमीचे स्मृतिस्थळ आहे. हे स्थळ वारकरी, संन्यासी, योगी आणि सर्व समाजातील भक्तांसाठी अध्यात्म, श्रद्धा आणि एकतेचे केंद्र आहे.

  • वैशिष्ट्ये:
  • अति प्राचीन नवनाथ व सिद्ध समाध्या
  • श्री विठ्ठलपंत-रुक्मिणी मंदिर व अजानवृक्ष परिसर
  • श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री मुक्ताबाईंची जन्मभूमी
  • वारकरी परंपरेचा जिवंत वारसा
  • शांत, निसर्गरम्य वातावरण